पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

वाद वाढला त्याला किरकोळ होते कारण! तीन गुंडांनी निर्दयीपणे दिले मयूरला मरण!

नाशिक

मग्रुरीत आणि गुन्हेगारीत बहकलेल्या तरूणाईला कशाचेच भान उरलेले नाही. किरकोळ कारणातून दहशत माजवण्याचा, गुंडगिरी करण्याचा प्रयत्न काही तरूणांचा असतो. लोक आपल्याला घाबरतात याचीच त्यांना मस्ती असते. याच गुन्हेगारीच्या नशेतून हे तरूण नवनवे गुन्हे करत रहातात. त्यांच्यावर कडक पोलीस कारवाई केल्याशिवाय ही गुन्हेगारी रोखता येणार नाही. नाशिकमध्ये काही तरूणांचा किरकोळ कारणातून वाद झाला. त्यातील एका तरूणावर तिघांनी डूख धरला होता. ते कोणत्याही क्षणी त्याचा काटा काढण्याच्या तयारीत होते. तो सावध होता, पण त्याच्या नातेवाईकानेच गुंडांना साथ देवून हत्यारे पुरवली आणि त्याचा भरदिवसा खून करण्यातही साथ दिली. या घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment