पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर हेडलाइन

दारूड्या पतीपासून झाली वेगळी, प्रविणचा लागला लळा! तोही झाला व्यसनी, तेंव्हा त्याचा प्रणिताने आवळला गळा!

कल्याण :

प्रविणच्या मित्राला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे त्याची पत्नी प्रणिताशी नेहमीच भांडण होत असे. हे भांडण सोडवण्यासाठी प्रविण जायचा, मित्राला समजावून सांगतांना मित्राची पत्नी प्रणिताला आधार देता-देता प्रविण तिच्यात गुंतत गेला. तिलाही पतीपेक्षा आधार देणारा पतीचा मित्र प्रविण आवडू लागला. मग दोघे एक झाले. दोघात प्रेम तयार झाले, शरीरसंबंध सुरू झाले. या सुखात कसलाच अडसर नको म्हणून दोघांनीही संसार सोडले, मुलांना वार्‍यावर सोडले आणि आपला वेगळा संसार थाटला. प्रविण-प्रणिताचा नवा संसार सुरू झाला, त्यांनाही एक मूल झाले, पण नंतर प्रविणलाही दारूचे व्यसन लागले. प्रणिताला आता दुसर्‍या दारूड्या नवर्‍याचा त्रास सुरू झाला. ती अस्वस्थ झाली होती. तोवर पहिल्या पतीचे निधन झाले होते. पोटाला एक मुलगा होता, तो मोठा होऊ लागला होता, तर दुसरा पती दारूच्या नशेत छळू लागला होता. अखेरीस तिने हतबल होऊन अविचार केला, त्यामुळे प्रविणचा जीव गेला आणि ती तुरूंगात गेली, त्या दोघांचीही मूले पोरकी झाली.

Leave a Comment