पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

पती-पत्नीतील कलह, त्यात आला मामा! भाचीचा पती संतोषवर हल्ला करतो नाना!

नाशिक

पती-पत्नीतील वाद, कलह हा केवळ त्या दोघांपुरताच मर्यादित रहात नाही, तर त्यांचे आई-वडील यासह अन्य नातलगांनाही त्या भांडणाची झळ बसते. मध्यस्थी करतांनाच नाही तर आपल्या नातेलगाशी भांडतो त्याच्याशी आपणही चांगले वागायचे नाही असे ठरवून खुन्नस ठेवली जाते. काही वेळा तर भांडण करणारे पती-पत्नी एक होतात, पण त्याच्यामुळे नातलगात आलेली कटूता मात्र कमी होत नाही. पती-पत्नीच्या भांडणात नातेवाईक किती वाईट वागू शकतात याचा नमुना नाशिकमध्ये पहाण्यास मिळाला. संतोष आणि पौर्णिमा यांच्यात वाद होता. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले, तेंव्हा समूपदेशनासाठी त्या दोघांना भरोसा सेलमध्ये बोलावण्यात आले होते. ते दोघे आपआपल्या नातेवाईकांसह आले होते. यामध्ये तिच्यासोबत तिचा मामा होता. शासन, न्याय व्यवस्था पती-पत्नीतील कलह मिटवून त्यांच्यात समेट घडवण्याचा व त्यांचा संसार सावरण्याच्या प्रयत्न होते, पण तिचा मामा मात्र तिच्या पतीचा काळ बनून आला होता. तिच्या मामाने धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने धारदार शस्त्रासह मुलीच्या मामाला ताब्यात घेतले.

Leave a Comment