नांदेड
रात्रीचे साडेदहा वाजले होते. अरविंद नुकताच झोपण्याच्या तयारीत होता. अचानक फोनची रिंग वाजली. नाव वाचून त्याने आनंदाने फोन उचलला, तो अगदी हलक्या आवाजात म्हणाला, ‘ठीक आहे. आज रात्री आपण भेटू.’ फोन ठेऊन तो उठला आणि घरातून बाहेर पडला. कोणालाही खबर न लागता तो सांगितलेल्या ठिकाणी पोहचला. त्याने त्या घराचा दरवाजा उघडला. हलक्या पावलांनी घरात प्रवेश केला. आत त्याची प्रेयसी त्याचीच वाट पहात होती. तो तिच्याशी बोलत असतांनाच दरवाजावर थाप पडली. बाहेरून तिचा पती हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगत होता. त्याचा आवाज ऐकून अरविंद आणि त्याची प्रेयसी दोघेही घाबरले. काय करावे हेच त्या दोघांना सुचत नव्हते. ते दोघे घरात होते, तर बाहेर तिचा पती, भाऊ आणि आणखी एक जण होता. पुढे काय होणार, हे अरविंद जनवाडेला कळून चुकले. रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला आलेल्या अरविंदचा प्रेयसीच्या पतीनेच संजय वाहुळे याने त्याचा खून केला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात….