पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नांदेड मराठवाडा महाराष्ट्र

वाद मिटवूया म्हणत दिला मैत्रीचा हात! रितेश-राहुलने केला शिवराजचा घात!

नांदेड

तरूणांमध्ये किरकोळ वादातून हाणामारीचे प्रसंग सगळीकडेच घडू लागले आहेत. अविचारी तरूण कोणतेही गैरकृत्य करण्याचे धाडस करतात आणि आयुष्याची वाताहत करून घेतात. नांदेड शहरापासून जवळच असणार्‍या पुणेगावमध्ये मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. मित्रांतील हा वाद लगेच मिटायला हवा होता, पण तो काही मिटला नाही. हा वाद मिटवूया असे सांगून दोघांनी एका मित्राला बोलावून घेतले. मित्रांवर विश्‍वास ठेऊन तो त्यांना भेटण्यासाठी गेला, पण त्या दोघांनी त्याचा विश्‍वासघात केला. त्याला एकट्याला गाठून ठार केले. विश्‍वासघातकी मित्रांच्या क्रूरतेचे दर्शन घडवणार्‍या या घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment