पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नांदेड मराठवाडा महाराष्ट्र

सांगूनही मेव्हणीचा नाद सोडत नव्हता किरण! संतापलेल्या शिवाने अखेर दिले त्याला मरण!

नांदेड

नांदेड शहरातील एका वस्तीत शिवा माने, त्यांची पत्नी आणि पत्नीची बहीण म्हणजे मेव्हणी हे तिघे एकत्र वास्तव्यास रहातात.  त्यांच्याच शेजारी किरण माने नावाचा विवाहित तरूण रहात असायचा. शेजारी-शेजारी त्यातच भावकीतील असल्यामुळे येता-जाता शिवाची मेव्हणी व किरण यांच्या नजरा नकळत मिळत असायच्या. त्यातूनच दोघामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. ही बाब जेंव्हा शिवा माने याला समजली, तेंव्हा त्याने किरणला समज दिली. आपल्या मेव्हणीचा नाद सोडण्यास सांगितले. यातून दोघांमध्ये भांडणे झाली आणि त्या भांडणामध्ये शिवा माने याने किरण माने याचा खून केला.

या खून प्रकरणी इतवारा पोलीस स्टेशन येथे आरोपी शिवा माने (वय 30, रा. नांदेड), अविनाश नंदाने (वय 29 रा. नांदेड) या दोघांवर गुन्हा रजि. नं. 222/2023 कलम 302, 34 भा.दं.वि. सह कलम 4/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी लोहा येथून अटक केले. या तपासात पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Leave a Comment