पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नांदेड मराठवाडा महाराष्ट्र हेडलाइन

डोकेच भडकले ऐकून शामकाचे प्रेमप्रकरण ! रागीट आण्णारावने दिले पोटच्या लेकीला मरण!

नांदेड

माणसाच्या काळजात एखाद्याने घर केले तर ते कायमस्वरूपी हृदयात कोरलं जातं, म्हणून तर माणसे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. लाख संकटं आली तरी त्या हृदयात कोरलेले चित्र वा प्रतिबिंब कधीच मिटत नाही. जग कितीही पुढारले तरी प्रेमाला लोक विरोध करतात. बहुतेकदा पालक मुलांच्या प्रेमाची भाषा समजून घेत नाहीत. मुलीने प्रेमविवाहाचा शब्द उच्चारला तरी बापाच्या अंगाचा तिळपापड होतो. अगदी नातेसंबंधातील तरूणाशी मुलीचे प्रेमसंबंधही काही वेळा मान्य केले जात नाहीत. त्यातून वाद वाढतात. या वादाचा शेवट काही वेळा एखाद्या गुन्ह्यात होतो. नांदेडमध्ये एका मुलीचे नात्यातीलच एका तरूणावर प्रेम जडले. तिच्या वडीलांना हे समजले. त्यांनी सुरूवातीला हरकत घेतली नाही, नंतर त्या मुलाची चौकशी केली असता तो मुलगा वर्तनाला चांगला नसल्याचे त्यांना समजले, त्यामुळे त्यांनी मुलीच्या प्रेमाला विरोध केला, तर मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. मुलगी ऐकत नसल्याच्या रागातून बापाने मुलीचा जीवच घेतला. या दुर्दैवी घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment