पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नांदेड मराठवाडा महाराष्ट्र हेडलाइन

प्रेमाला विरोध झाला, म्हणून जवळ केले मरण!  सुप्रियाचा जीव गेला, रोहिदास पोलिसांना शरण!

नांदेड

प्रेम या अडीच अक्षरी शब्दाचा प्रवास माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाईल हे सांगणे कठीणच होऊन बसले आहे. तारूण्याच्या उंबरठ्यावर प्रेम जमते हे नैसर्गिकच आहे. या प्रेमाची सफलता-असफलता परिस्थितीवर अवलंबून असते. बहूतेकदा प्रेमाला विरोधच होतो. जग कितीही बदलले तरी प्रेमाला विरोध करण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. आजही अगदी नातलगांमध्ये शक्य असले तरी प्रेमविवाह म्हटले की नकार ठरलेलाच असतो. हा नकार पचवणे अनेक प्रेमीयुगुलांना कठीण जाते. यातून सावरण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आप-आपल्यापरिने करतो. काही जण वेगळे होतात आणि निराशेत आयुष्य जगतात. काही पळून जाऊन लग्न करतात, तर काही जीवन संपवण्याचा दु:खद निर्णय घेतात. नांदेड जिल्ह्यातील एका प्रेमीयुगुलाच्या प्रेमकहाणीचा शेवटही दु:खदच झाला. विष प्राशन करून प्रेयसीने आयुष्य संपवले, तर विष प्राशन केलेल्या प्रियकराचा जीव वाचला. आता प्रेमिकेला विष पाजल्याच्या गुन्ह्यात तो अडकला आहे.

Leave a Comment