पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नंदूरबार महाराष्ट्र हेडलाइन

पंकज-रोशनच्या मनात घुमला वासनेचाच संचार! मनोरूग्ण महिलेचा घेतला जीव करून अत्याचार!

नंदूरबार

रोज मरे त्याला कोण रडे?फ अशीच अवस्था पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांची असते. घटना कितीही गंभीर आणि हृदय हेलावून टाकणारी असली तरी तपास पथकांकडून जाणते-अजाणतेपणी उदासिनता दाखवली जाते. अशा वेळी घटना कितीही गंभीर असली तरी या उदासिनतेमुळे तपासाला गती मिळत नसल्याने पिडीतांवर अन्याय होण्याची शक्यता असते. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. यामध्ये काही अधिकारी असे असतात की प्रत्येक गोष्टीला न्याय हा द्यायचाच, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावायचे, मग कोणतेही संकट येवो अथवा अडथळा येवो. समाजातील गुन्हेगारीला नेस्तनाबूत करून समाजातील दुर्बल घटकांना, पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांची धडपड असते, नव्हे ते याच उद्देशाने पोलीस खात्यात रूजू झालेले असतात. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील आणि धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण हे होत. त्यांच्याच कर्तृत्वाचे हे पुढील उदाहरण.

Leave a Comment