पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नंदूरबार महाराष्ट्र

धिक्याने सामायिक बांधावरचे सागवानाचे झाड तोडले! विरोध केला म्हणून भाऊ रमेशला जमाव करून तोडले!

नंदुरबार

एकाच आई-बापाच्या पोटी जन्म घेतलेली मुले, लहानपणापासून एकमेकावर माया करत मोठी होतात. भाऊ म्हणजे पाठीराखा असे मानले जाते. एकमेकावर जीवापाड प्रेम करणारे हे भाऊ मोठे होतात, त्यांची लग्ने होतात, तेंव्हा मात्र त्यांच्यात कटूता येते. बहुतेकदा वडीलोपार्जित संपत्तीवरून भावा-भावात तंटा निर्माण होतो. शेतजमिनीवरून तर भाऊ-भाऊ, वडील-मुलगा यांच्यातही वैर निर्माण होते. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधव वनजमिनी कसून उदरनिर्वाह चालवतात. वारसाहक्काने या जमिनीच्याही वाटण्या होतात. त्याच पध्दतीने चार भावांना चार एकर जमिन वाटून मिळाली. प्रत्येक जण वाटणीला आलेली एक एकर जमीन कसत होता. दोन भावांच्या सामायिक बांधावर एकाने सागवानाची झाडे लावली. झाडे लावतांना व ती मोठी करतांना दुसर्‍या भावाने काही आक्षेप घेतला नाही, पण झाडे मोठी झाली तेंव्हा मात्र त्याला हाव सुटली आणि तो त्या झाडावर हक्क सांगू लागला. इतकेच नाहीतर त्याने ती झाडे तोडण्यास सुरूवात केली. भावा-भावात वाद पेटला, तेंव्हा दुसर्‍याचे पंचायत बोलावली, पंचांनीही पहिल्या भावाच्या बाजूने निर्णय दिला. मग मात्र चिडलेल्या दुसर्‍या भावाने नातेवाईकांना घेऊन भावावर हल्ला करून त्याला ठार मारले. एक भाऊ मरून गेला, त्याला मारणारा दुसरा भाऊ बायको, मूले, नातेवाईकांसह तुरूंगात गेला.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल वस्तीत ही घटना घडली असून यामध्ये रमेश दादला पावरा याचा खून त्याचा भाऊ धिक्या पावरा याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने केला आहे. धडगाव पोलिसांनी सर्व संशयितावर गुन्हा रजि. नं. 162/2023 नुसार भा.दंं.वि. 302, 324, 147, 148, 149, 504, 506 तसेच म.पो.का. अधिक 37 (1) 83, 135 अन्वये गुन्हा दाखल केला.

या भयानक घटनेची गंभीर दखल नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी घेतली. त्यांनी घटनास्थळाला भेट देत हल्लेखोरांना तातडीने गजाआड करण्याचे आदेश धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आय.एन. पठाण यांना दिला.

वरीष्ठांच्या आदेशाची दखल घेत पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण यांनी आपल्या सहकार्‍यांना कामाला लावून धिक्या दादला पावरा याच्यासह सर्व संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या व त्यांना गजाआड केले.

Leave a Comment