पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

गुप्तधनाची लालसा उतरली अंधश्रध्दाळूंच्या गळी! तुरूंगात गेली चौकडी, देऊन कृष्णाचा नरबळी!

नाशिक

अंधश्रध्देचा विळखा आजही समाजमनावर घट्ट आवळला गेला आहे. कोणीही काहीही सांगितले तर लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. आजवर करणी, भानामती, गुप्तधन अशा कशाचेच एकही उदाहरण कोणाला दिसलेले नाही तरीही लोक आंधळेपणाने विश्‍वास ठेवतात आणि आयुष्याची वाताहत करून घेतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पोहाणे गावात अमावस्येच्या रात्री अघोरी कृत्य करण्यात आले. अंगात येणार्‍या भगताने सांगितले म्हणून गुप्तधनाच्या लालसेपोटी पाच जणांनी कटकारस्थान करून 9 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. गुप्तधन मिळेल त्याठिकाणी या बालकाला नेवून त्याचा गळा कापून नरबळी दिल्याची भयानक घटना घडली. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला. गुप्तधनाच्या लालसेपोटी अल्पवयीन मुलाची क्रूरपणे हत्या करून नरबळी दिला, पण गुप्तधन मिळाले नाहीच तर एका बालकाचा जीव घेणार्‍यांना गजाआड व्हावे लागले.

 कृष्णा अनिल सोनवणे असे त्या बालकाचे नाव असून सदर बालकाच्या खून प्रकरणी उमाजी गुलाब मोरे, रोमा बापू मोरे, रमेश लक्ष्मण सोनवणे व गणेश लक्ष्मण सोनवणे या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली, तर याती लक्ष्मण नवल सोनवणे हा फरार झाला आहे. या सर्व संशयिताविरूद्ध  गुन्हा रजि. नं. 224/2023 नुसार भा.दं.वि. कलम 364, 302 व 201 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Leave a Comment