पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा गोवा हेडलाइन

पोटासाठी आले, सोबत होता वाद मालमत्तेचा! चुलत भावांनी रचला कट चंद्रिकाच्या हत्येचा!

जुने गोवा

गेल्या काही वर्षापूर्वी उत्तरप्रदेश मिर्झापुर येथून चंद्रिका साहनी गोव्यात आला. सुतार काम करत येथेच स्थिरावला. दरम्यान दोन-तीन वर्षापूर्वी त्याचे तीन चुलत भाऊही कामाच्या निमित्ताने आले. परप्रांतात पोटासाठी आलेल्या या भावांमध्ये वारंवार भांडणे व मारामारी होत होते. याचे कारण गावाकडच्या जमिनीचा वाद. वडीलोपार्जित जमिनीच्या वादाने अनेकांच्या आयुष्याची वाताहत केली आहे, तरीही लोक सामोपचाराने वाद मिटवत नाहीत. पोटासाठी गावोगाव फिरण्याची वेळ आली तरी गावाकडच्या जमिनीचा वाद मिटण्याचे नाव घेत नव्हता. या वादातून जे व्हायचे तेच झाले, यातूनचच चंद्रिका साहनी याचा जीव गेला तर राजेंद्र, राजकुमार आणि रणजीत प्रसाद या तीन भावांसह त्यांचा मित्र अखिलेशकुमार सहानी हादेखील तुरूंगात गेला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…

Leave a Comment