पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या पानभर-जगभर मनोरंजन राजकारण सामाजिक हेडलाइन

लक्ष वेधण्याचा फंडा..

सार्वजनिक जीवनात वावरतांना काही नीतिनियमांचे पालन करण्याची गरज असते, पण काही वेळा सत्ता, संपत्तीचा माज म्हणून असेल किंवा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असेल, काही लोक घाणेरडे वागतात. त्यांच्या वागण्यामुळे लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते, हे खरे असले तरी त्यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटतात, तेंव्हा मात्र चूक लक्षात येते. पण झालेली चूक लपवता येत नाही. अमेरिकेतील स्टेट सेनेटर असणार्‍या टियाला मॅक हिच्या बिकीनीतील व्हीडीओवर सध्या जोरदार टिका सुरू असून हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

टियारा मॅक ही 28 वर्षीय तरूणी कायद्याची पदवीधर आहे. ती अमेरिकेतील रोड आयलँडच्या डिस्ट्रिक्ट 6 च्या सिनेट निवडणुकीत निवडून आली. जानेवारी 2021 पासून ती सिनेटर म्हणून त्या प्रांताचे प्रतिनिधीत्व करते. ती निवडणुकीत उमेदवार होती, तेंव्हापासून ती चर्चेत आली होती, कारण ती समलैंगिक समुदायाचा घटक आहे, त्यामुळे ती सर्वसाधारण गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी तिला 60 टक्के मते मिळाली आणि ती सिनेटर झाली. याशिवाय ती साऊथ न्यू इंग्लड येथील प्लॉड पॅरेंटहूडमध्ये यूथ ऑर्गनाईजिंग स्पेशालिस्ट म्हणून काम करते. एकूणच एक उच्चशिक्षित, उच्चभ्रू आणि लोकमताचा आधार असणारी ती लोकप्रतिनिधी आहे, पण अलिकडेच तिने एक व्हीडीओ तिच्या सोशल मीडीयाच्या अकौंऊटवर अपलोड केला, त्यामुळे ती चर्चेत आली.

या व्हीडीओमध्ये ती अत्यंत तोकड्या टू पिस बिकीनीमध्ये डान्स करतांना दिसते. अगदी शिर्षासन करून तिने तिचा भरलेला देह तोलून धरल्याचेही दिसते. व्हीडीओच्या शेवटी ती लिहिते, ब्लॉक आयलँडकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतांना एक हुषार सिनेटर. पण स्वत:ला हुषार म्हणत तिने जे काही केले, त्यावर जोरदार टिकेची झोड उठली. तिच्या या वर्तनाचा अनेकांनी निषेध केला, काहींनी खिल्ली उडवली. तेंव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे झाल्याचे तिच्याही लक्षात आले असावे, त्यामुळे तिने तिला ट्रोल करणार्‍यांना उत्तरे देण्यास सुरूवात केली. आपल्या वर्तनाचे समर्थन करण्याचा तिचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे दिसते.

Leave a Comment