पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या पानभर-जगभर सामाजिक हेडलाइन

मोबाईल बिघडला, नियत बिघडली

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात आला आहे, पण त्याबाबत जागरूकता आहेच असे नाही. विकसित देशातही मोबाईल वापराबाबत लोकांमध्ये कमी माहिती असते. मोबाईल बिघडला म्हणून दुरूस्तीला देतांना काळजी नाही घेतली तर काय होते? तसेच दुरूस्तीला दिलेल्या मोबाईलमधील डेटाचा वापर चुकीच्या पध्दतीने केला तर त्याचे परिणाम काय होतात? याचा नमुना असणारी घटना सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.

लेबनॉन येथील एका महिलेचा स्मार्टफोन बिघडला. फोन लॉक-अनलॉक करण्यात अडचण येऊ लागली, तेंव्हा त्या महिलेने त्या परिसरातीलच सोलोमोन डोगा या 22 वर्षीय तरूणाला हा फोन दाखवला. त्याने तो दुरूस्त करून देण्यासाठी स्वत:कडे घेतला. या मोबाईलमध्ये त्या महिलेचे नग्नावस्थेतील वेगवेगळ्या पोझमधील फोटो होते. तसेच प्रियकराबरोबरचे फोटोही होते. हे फोटो सोलोमोनला दिसले. त्याने त्याकडे दुर्लक्ष करून दुरूस्तीवर लक्ष द्यायला पाहिजे होते, पण त्याने ते फोटो आपल्याकडे ट्रान्स्फर करून घेतले. आता त्या महिलेची सारी गुपिते त्याच्याकडे आली होती. जेंव्हा ती फोन न्यायला आली तेंव्हा त्याने तिला तिचे न्यूड फोटो दाखवले. हे फोटो माझ्याकडे आहेत, मी हे व्हायरल करू शकतो अशी धमकी त्याने तिला दिली, पण ती बिनधास्त महिला होती, तिने त्याच्या धमकीला जुमानले नाही. ते फोटो डिलीट कर असे सांगून ती निघून गेली. त्यानंतरही तो तिला वारंवार फोन करून पैशाची मागणी करू लागला. तिला ब्लॅकमेल करू लागला, तेंव्हा तिने सरळ त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे तो चिडला. तिचा त्याला राग आला. या रागाच्या भरात त्याने तिचे काही फोटो सोशल मीडीयावर अपलोड केले. हे फोटो व्हायरल झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सोलोमोनला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात गेले. त्याला नुकतीच 14 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. काळजी न घेतल्याने तिचे खासगी फोटो दुसर्‍याच्या हाताला लागले आणि जगजाहीर झाले, तर गैरफायदा घेतल्याने त्याला 14 वर्ष तुरूंगात सडण्याची वेळ आली.

Leave a Comment