पुणे – हिंजवडी
गरीबीत माणूसच माणसाला आधार देतो असे मानले जाते, कारण समदु:खी लोक एकमेकाला समजून घेऊ शकतात अशी धारणा आहे, पण अलिकडचा काळच मोठा विचित्र बनला आहे. येथे माणसाला माणसाची किंमतच उरलेली नाही. आपल्यासारख्याच पिचलेल्या माणसाचा घात करतांना कोणालाच काही वाटत नसल्याचे चित्र आहे. पुण्यात पोटा-पाण्यासाठी नेपाळ देशातून लोक आले आहेत. यातील काही लोक भंगार गोळा करून उदरनिर्वाह चालवतात. यामध्ये चौघे जण एकत्र होते, त्यातील एक जण भंगाराचे सगळे पैसे घ्यायचा, इतरांना तो काहीच वाटणी देत नव्हता. त्या सगळ्या पैशाची दारू पार्टी करायची असे तो म्हणायचा. त्याच्या या उर्मट वर्तनाला आणि व्यसनाला त्याचे मित्र पार वैतागून गेले होते. ते त्याच्याशी वाद घालत होते. या वादाचे पर्यावसान म्हणजे त्याला जीव गमवावा लागला.