पोलीस टाइम्स
अहमदनगर आमच्या विषयी आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र कथा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् बुलढाणा मनोरंजन महाराष्ट्र राशी-भविष्य विज्ञान कथा / गुढ कथा विदर्भ सांगली हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार, दि. 23 जुलै 2023 अंक  15 साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा.

दुसर्‍याशी बायको बोलते, हे पाहून संशयाने घेरले! यल्लाप्पाने पत्नी रेणुकासह मल्लिकार्जुनलाही मारले!

गोकाक

गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ येथे यल्लाप्पा माळगी हा पत्नी मुलासह रहात होता. त्याची पत्नी रेणुका दिसायला सुंदर होती, तर त्याचा शेजारी मल्लिकार्जुन बाईलवेडा होता. रेणुका आणि मल्लिकार्जुन या दोघांना हसत बोलत असतांना त्याने पाहिले. मुळातच देखण्या व हसर्‍या बायकोवर त्याचा संशय त्यातच ती बायकांचा नाद असणार्‍या मल्लिकार्जुन बरोबर हसते-खिदळते म्हणजे नक्कीच काहीतरी पाणी मुरते हा विचार यल्लाप्पाच्या मनात यायला वेळ लागला नाही. या संशयातून तो इतका वेडापिसा झाला की त्याने रेणुका आणि मल्लिकार्जुन या दोघांचाही निर्घृण खून केला. या घटनेची गोकाक पोलिसांनी दिलेली माहिती अशी…!

तक्रारीत नाव गोवल्याचा राग, त्यात मध्यस्थीला आले! पोलीस पाटील संदीप यांना जमावाने निर्घृणपणे मारले!

कोल्हापूर

पोलीस पाटील म्हणजे गावातील शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी असणारा अधिकारीच. कायद्याने जे योग्य ते करण्याचे त्यांचे कर्तव्यच असते, पण एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पाटीलानेच आपले नाव गोवले असा समज स्थानिक पातळीवर करून घेतला जातो. यातूनच काही वेळा पोलीस पाटीलांवर काही जण डूख धरून रहातात. यापासून अनभिज्ञ असल्याने काही वेळा एखाद्याचा जीवही जातो. कोल्हापूर जिल्ह्यात याचाच नमुना दाखवणारी घटना घडली. नवरा- बायकोच्या भांडणात बायको मुलासह माहेरी निघून गेली, तेंव्हा मुलाला परत आणण्यासाठी तिचा नवरा हातात खुरपे घेऊन सासरवाडीत पोहचला. तो काहीतरी बरे-वाईट करेल या भीतीने त्याच्या सासर्‍याने पोलीस पाटीलांना फोन करून बोलावले. पोलीस पाटील तिथे पोहचले, तेंव्हा जमावाने त्यांना पूर्ववैमनस्यातून ठार मारले. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटीलांचा यापध्दतीने झालेला निर्घृण खून धक्कादायकच आहे.

व्यसनी पती मधुकरच्या त्रासाला गेली वैतागून! रात्रीच्या काळोखात  पुष्पाने केला त्याचा खून!

अहमदनगर

दारू हे एक असे व्यसन आहे की त्यामुळे माणूस माणसातून उठतो. घर-संसार, बायको-मुले या सगळ्यांचा त्याला विसर पडतो. तसेच हे सगळेही त्याच्यापासून आपोआप दूर जाऊ लागतात. बायको-मुलांना तर दारूडा नवरा-बाप नकोसाच झालेला असतो, त्यामुळे आधार देणारी आपली माणसेच वैरी बनून जीवावर उठतात. अहमदनगर जिल्ह्यात याचेच दर्शन घडवणारी घटना घडली. यामध्ये नवरा दारू पिऊन त्रास देत होता, मुलांनाही शिवीगाळ करत मारहाणही करत होता. या त्रासाला कंटाळून एका रात्री बायकोनेच नवर्‍याची हत्या केली. नंतर चोरांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला, पण पोलिसांच्या नजरेतून खरा संशयित सुटला नाही.

शिक्षण सोडून प्रेमात  वेळ घालवते सारा! लेकीच्या छातीत संतोषने खुपसला सुरा!

सांगली

आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे अशी पालकांची अपेक्षा असते, पण तरूण वयात मुले-मुली एकमेकाकडे आकर्षित होतात. त्यातून प्रेम जमते, हे बहूतेक पालकांना मान्य नसते. त्यातून आई-बाप आणि मुलांमध्ये कुरबुरी सुरू होतात. मुलांवर बंधने घातली जातात, पण तारूण्यात बंधने तोडण्याकडेच मुलांचा कल असतो. यातून काही वेळा मारहाण होण्याचे प्रकार होतात, तर काही वेळा पोटच्या मुलीचा जीव घेण्याचा अविचारही घडतो. सांगली जिल्ह्यात याचेच दर्शन घडवणारी घटना घडली. मुलगी प्रेमसंबंध तोडत नसल्याच्या कारणातून बापानेच तिचा जीव घेतला.

मालकाला म्हणाले,जमिनीवरचा हक्क नाही सोडणार! नंतर जमाव करून त्याच्या मुलांसह केले दोघांना ठार!

बुलढाणा

दि. 1 जुलै शनिवारचा दिवस पहाटेच समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा ता. सिंदखेड राजा नजीक ट्रॅव्हल्स अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची काळीज हेलावणारी  विदारक घटना संपूर्ण देशात पसरली होती. या घटनेची जिल्ह्यासह राज्यात हळहळ व्यक्त केली जात होती. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वाघ हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय खामगाव येथे शासकीय कामानिमित्त आले होते. त्यांच्या मोबाईलवर सकाळी 11 वाजता एक कॉल आला,  कॉल करणार्‍या व्यक्तीने घाबरलेल्या स्वरात आपले नाव अहमद खान रहाणारा लाखनवाडा असे सांगितले. ‘साहेब.. साहेब.. लवकर या लाखनवाडा चिंचपूर रस्त्यावर एका शेतात चाकू व लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये दोघे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले आहेत. बहुतेक त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसते,’ एवढे बोलून पलीकडच्या व्यक्तीने कॉल कट केला. त्या व्यक्तीच्या दोघांचा मृत्यू झाला वाक्याने वाघ थबकलेच, त्यांनी परत त्या व्यक्तीला कॉल करून खरंच दोन व्यक्तीचा मृत्यू झाला का? या विचाराने त्यांनी यंत्रणा सक्रिय केली आणि एक थरारक घटना उघडकीस आली.

Leave a Comment