पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

दत्तात्रयकडून घेतले 15 लाख, परत मागितल्याने वाटे पिडा! अक्षयने समीरच्या साथीने घातला त्याच्या डोक्यात हातोडा!

पुणे- भोर

शिवराम राघु पिलाने (वय 65, रा. शनीनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे) यांना दत्तात्रय (वय 32) नावाचा मुलगा आहे. तो विवाहित आहे, पण त्याची बायको त्याच्याजवळ रहात नाही. दत्तात्रय पिलाने हा दि. 10 मार्च 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या मित्राबरोबर बाहेर गेला होता, पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. अक्षय सुनिल होळकर या मित्राबरोबर तो बाहेर गेल्याचे त्याच्या वडीलांना माहिती होते, म्हणून मिसींगची तक्रार देतांना वडील शिवराम यांनी अक्षयचा उल्लेख तक्रारीत केला होता. ही तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तपासासाठी अक्षय होळकर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले, पण त्याने दत्तात्रय कुठे गेला हे आपणांस माहित नाही असे सांगितले. कित्येक दिवस दत्तात्रयचा पत्ता लागत नव्हता.

अखेर दत्तात्रयचा मृतदेह मिळून आला.

दि. 17 मार्च 2023 या दिवशी भोर पोलीस स्टेशनमध्ये वारवंड गावच्या पोलीस पाटीलांचा फोन आला. वारवंड गावचे हद्दीत भोर-महाड रोडच्या कडेला एक अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला आहे, असे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. भोर पोलिसांनी घटनास्थळी इन्क्वेस्ट पंचनामा जागीच करण्याचे ठरवले. मृतदेह अनोळखी होता, म्हणून भोरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दबडे यांनी त्या मृतदेहाचे फोटो तालुक्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप व सोशल मीडीयाद्वारे पाठवून नागरिकांना आवाहन करण्यात आले. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्टेशन, रायगड जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्टेशन, पुणे आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस स्टेशनला मिसिंग व्यक्तीबाबत माहिती कळवण्यात आली.

मित्रानेच खून केल्याचा पोलिसांचा कयास

दरम्यान सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये एक मिसींग दाखल आहे ही माहिती समजल्यानंतर तेथील मिसींग व्यक्तीचा फोटो आणि मृतदेहाचे फोटो पडताळून पाहिले असता त्या फोटोमध्ये साम्य असल्याचे दिसून आले. भोर पोलिसांनी सदर मिसींग व्यक्ती म्हणजे दत्तात्रय पिलाने याचा मोबाईल नंबर घेवून त्याचे कॉल डिटेल्स काढले. मिसींग तक्रारीत अक्षय होळकर याच्यासमवेत तो गेल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी अक्षय होळकर याच्या मोबाईलचेही कॉल डिटेल्स तपासले असतांना पोलिसांना अक्षय होळकरबाबत संशय येवू लागला.

त्या संशयावरून भोर पोलीस अक्षय होळकरचा शोध घेवू लागले. त्याच्या मोबाईल नंबरवरून त्याचे लोकेशन तपासत असतांना तो मोबाईल चालू-बंद करत असल्याचेही पोलिसांना समजून आल्याने पोलिसांचा संशय वाढू लागला. अखेरीस त्याच्या मोबाईल लोकेशवरन माहिती काढत त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या अक्षयकडे चौकशी केली असता थोड्याच वेळात त्याने आपला गुन्हा कबुल केला.

उसने घेतलेले पैसे परत मागतो म्हणून मित्रानेच केला खून

अक्षय आणि दत्तात्रय हे दोघे मित्र होते. त्या मैत्रीच्या नात्यातून अक्षयने दत्तात्रयकडून गाडी घेण्यासाठी 10-15 लाख उसने घेतले, पण गाडी न घेता ते सारे पैसे त्याने चैनीवर उडवले. ही बाब दत्तात्रयच्या लक्षात आल्यानंतर तो पैसे परत मागू लागला. परत दिले नाही तर मारण्याची धमकीही देवू लागला. याबाबत उद्याचे वायदे करत पैसे देण्यास टोलवाटोलवी करण्यास सुरूवात केली. दत्तात्रय मात्र पैशाचा तगादा लावू लागल्याने अक्षयने त्याला मारण्याचे ठरवले.

असा केला प्लॅन

दि. 8 मार्च 2023 रोजी मी दत्तात्रयला आपण कोकणात फिरायला जावू असे म्हणत अक्षयने त्याला गाडीत घेतले. यावेळी समीर शेख या मित्रासही त्याने बोलावून घेतले हेाते.  तिघे मिळून कात्रज, खेडशिवापूर, भोर मार्गे महाड येथे गेलो.  त्याला पाठीमागून घाटात ढकलून देण्याचा प्लॅन होता, पण तो शुद्धीत असल्याने हा प्लॅन यशस्वी झाला नाही. त्यानंतर दि. 9 मार्च 2023 रोजी दत्तात्रयने अक्षयने त्याच्या रूमवर बोलावून ‘उद्या 10 तारीख आहे, मला पैसे दे’ असे म्हणाला. पैसे नसल्याने अक्षय टेन्शनमध्ये अलाा आणि त्याने दत्तात्रयला कसेही करून मारायचे असे ठरवले.  त्यासाठी त्याने  एक हातोडा विकत घेतला. तसेच घरातून एक स्टीलचा पोपटी मुठ असलेला चाकू घेतला. तो चाकू व हातोडा माझ्या गाडीत ड्रायव्हर सीट खाली ठेवून दिला.

दुसरा दिवस उजाडला. आज दत्तात्रय पैसे मागणारच म्हणून अक्षयने समीर शेखला बोलावून घेतले. त्यास  सांगितले की, ‘दत्तात्रय मी घेतलेले पैसे मागत आहे व खूप त्रास देत आहे. त्याला बाहेर फिरायला घेवून जाऊन त्यास दम देवू तू नवले पुलाजवळ ये.’ असा फोन केला. त्यानंतर मी अंदाजे 3.30 वाजता दत्तात्रयला फोन करून सांगितले की, ‘तुमचे पैशाचे काम करतो. माझ्यासोबत चला मी आपल्या सोसायटीत इको गाडी घेवून थांबलो आहे.’ थोड्या वेळाने दत्तात्रय सोसायटीच्या खाली आला. त्याने अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट व काळे रंगाची नाईट पॅट घातलेली होती. तो गाडीत बसल्यानंतर मी म्हणालो, ‘मला 2 दिवस दे, तुला तुझे पैसे देतो.’ तेंव्हा तो मला म्हणाला, ‘तुला 2 दिवस देतो, पण तू मला पैसे दिले नाहीतर तुझ्या घरी येवून खल्लासच करतो.’

यावर अक्षय म्हणाला, ‘मला एक साहेब पार्टी देणार आहे. माझ्यासोबत चल, आपण एन्जॉय करू.’ त्यानुसार इको गाडी नं. एम.एच. 12 एस. वाय.5039 मधून ते दोघे नवले ब्रिज येथे आले, तेथे समीर शेख आला होता. त्याला गाडीत घेतले. एका परमीट बारमध्ये जावून तिघांनी बिअर प्याली. यावेळी दत्तात्रयला बिअर जास्त प्यायला लावली होती.

मृतदेहाची लावली विल्हेवाट

 रात्री 9.30 वाजले होते. गाडी पुण्याच्या दिशेने जावू लागली. दत्तात्रय हा अक्षयच्या बाजूच्या सीटवर बसला होता. तो नशेत होता. पुढे दारवली गाव आले. आम्ही गाडी पुणे-कोलाड रोडवरून डाव्या बाजूस माळरानावर थांबवून अक्षय आणि समीरने दत्तात्रयला ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह वरंदा घाटाचे अलीकडे वारवंड येथे रोडच्या कडेला उताराच्या बाजूला फेकून दिला, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी कपडेही जाळून टाकले.

अक्षय होळकर याने दिलेल्या या कबुली जबाबानंतर सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी फिर्याद दिली. तो गुन्हा भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 51/2023 भा.दं.वि. कलम 302, 364, 201, 34 प्रमाणे नोंदवण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या पोलिसांनी तपास केला

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलजी दबडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजु मोमीन, पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत, तसेच भोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार उध्दव गायकवाड, विकास लगस, अविनाश निगडे, यशवंत शिंदे, पोलीस नाईक निलेश सटाले, दत्तात्रय खेंगरे, शौकत शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर झेंडे, महिला पोलीस हवालदार वर्षा भोसले व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका जगताप यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला.

Leave a Comment