पुणे- सिंहगड रोड
तो अवघा 19 वर्षाचा होता. पोटासाठी गाव सोडून पुण्यात येऊन राहू लागला होता. लहान वय, कामाची जबाबदारी असणार्या त्या मुलाच्या मनात वासनेचा मात्र विकृत खेळ सुरू झाला होता. त्याच्यासोबत काम करणार्या एका 45 वर्षीय महिलेवर त्याची विकृत नजर पडली होती. तो तिची छेड काढू लागला होता. तिला अश्लिल मॅसेज पाठवत होता. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. तिने हा प्रकार कारखान्यातील वरीष्ठांना सांगितला. तसेच मुलगी व जावयालाही सांगितला असता तिचा जावई त्या मुलाला समजावून सांगण्यासाठी गेला, पण त्या मुलाने समजावून न घेता तिच्या जावयावरच चाकूने वार केले. त्याला ठार मारून तो मुलगा पळून गेला. इतक्या लहान वयात मनातील इतकी विकृती की आईपेक्षाही मोठ्या वयाच्या महिलेवर त्याने वाईट नजर ठेवली. हे वाईट आहे हे सांगायला आलेल्या तिच्या जावयाचा खून केला. आता पुरे आयुष्य तुरूंगाच्या कोठडीत घालवण्याची वेळ त्याच्यावर आली आहे
नवनवीन गुन्हे विश्वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696 वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)