पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

 तरूणाईचा अविचार, मनात खुन्नस फार! प्रकाशला टोळक्याने दिला मरेपर्यंत मार!

पुणे – भारती विद्यापीठ

खुनाची घटना कधी कशावरून घडेल हे सांगता येत नाही. पुणे शहरामधील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना नुकतीच काही दिवसापूर्वी घडली होती. नुसते एकमेकाकडे खुन्नसने पाहिल्याने दोघात थोडी तूऽतूऽ-मैऽमैऽ झाली होती. त्यादिवशीची ती वेळ टळली, पण दोघांच्याही मनातील राग गेला नव्हता. पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला. नंतर दोघे अचानकपणे आमने-सामने आले, त्यातील एक जण मित्रांबरोबर दारू ढोसत बसला होता. दरम्यान त्याला दुसरा नशेत डुलत जातांना दिसला. तो नशेत आहे, एकटा आहे पण आपल्यासोबत आपले मित्र आहेत, आपण त्याला सहज अद्दल घडवू शकतो असा अविचार त्याने केला. त्याचे मित्रही साथ द्यायला तयार झाले आणि चौघांनी एकट्याला घेरले. बेदम चोप दिला. लोक जमले तसे टोळके निघून गेले. मारहाण झालेलाही उठून घरी गेला, पण त्याला इतका मार बसला होता की त्याचा जीव गेला. तरूणाईच्या अविचाराने दर्शन घडवणार्‍या या घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment