पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा महाराष्ट्र हेडलाइन

उसनवारी अन् बदनामीच्या धमकीने आले वाकडे! चिडून महातेशने केले अकबरचे कोयत्याने तुकडे!

रायबाग/चिक्कोडी-

मैत्रीत वितुष्ट यायला वेळ लागत नाही. त्यातच पैशाच्या उसनवारीतून वाद पेटण्याचे प्रकार खूपदा घडतात. काही वेळा मित्राचे गुपित माहित असते. त्या गुपिताचे भांडवल करून काही जण ब्लॅकमेल करण्याचा उद्योग करतात, तेंव्हा मैत्री संपून शत्रुत्व सुरू होते, त्यामुळे मित्राला गुपित सांगतांनाही काळजी घेण्याची गरज होते. रायबाग तालुक्यात अकबर आणि महातेश हे दोन मित्र चोर्‍यामार्‍या करायचे, दारू पिऊन फिरायचे. महातेशचे एका तरूणीशी सूत जुळले. तिच्याबरोबरचे एकांतातील अश्‍लिल फोटो त्याने मोबाईलवर काढले होते. हे फोटो त्याने मित्र अकबरला दाखवले. दरम्यान अकबरने महातेशकडून 10 हजार रूपये उसने घेतले होते. ते पैसे तो काही परत देत नव्हता. साहजिकच पैसे परत मागण्यासाठी महातेशने अकबरकडे तगादा लावला होता. त्यातच अकबरने महातेशचा मोबाईल काढून घेतला. आता त्याच्या हाती एक शस्त्रच आले. महातेश उसने पैसे परत मागू लागला की अकबर त्याला मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. महातेश पुरता कचाट्यात सापडला. पैसे अडकले, मोबाईल अडकला, शिवाय फोटो व्हायरल होण्याची टांगती तलवारही डोक्यावर होती. याला कारणीभूत होता अकबर. त्यालाच नाही ठेवले तर, सगळेच विषय मिटतील असे महातेशला वाटले. पुढे जे झाले ते मैत्रीतील विश्‍वासघाताचेच उदाहरण ठरले.

Leave a Comment