पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली हेडलाइन

राजेंद्र वैतागला व्यसनी मुलाच्या तापाने! रोहितचे तुकडेच केले त्रासलेल्या बापाने!

सांगली

पोटच्या मुलाचा सगळेच लाड करतात. आपल्या मुलाला सगळी सुखे मिळावीत असे सर्वच आई-वडीलांना वाटत असते, पण काही मुले पालकांच्या प्रेमाचा, लाडाचा गैरफायदा घेतात. त्यांची फसवणूक करून ते व्यसनाच्या आहारी जातात, हाणामार्‍या करतात. हळूहळू बाहेर वागतात, तसेच घरातही वागू लागतात. आई वडीलांना त्रास देतात. काही वेळा तर आई-बापाला मारहाण करायलाही मागे-पुढे पहात नाहीत. मुलाचे हे रूप पाहून आई-वडील हबकून जातात. आपण याला इतके प्रेमाने सांभाळले आणि हा इतका नालायक कसा झाला या विचाराने हतबल होतात, पण काहीच इलाज चालत नाही. त्यांची ही हतबलता मुलाला शेफारून ठेवते, पण एखाद्या बापाचा संयम संपतो, तेंव्हा मात्र तो पोटच्या मुलालाच अद्दल घडवण्याचा विचार करतो. हे करत असतांना मात्र आपण गुन्हेगार होऊ याचाही तो विचार करत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यात घडली. मुलाच्या त्रासाला वैतागलेल्या बापाने त्याला ठार मारले. मृतदेहाची विल्हेवाटही लावली, पण तो हे कृत्य फार काळ लपवू शकला नाही. पोटच्या पोराला मारल्याचे त्याने रडत-रडत कबूल केले.

Leave a Comment