सांगली-कवठेमहांकाळ
एखाद्या चित्रपटात हाणामारीचे प्रसंग पहातांना अनेक तरूणांना स्फुरण चढत असते. चित्रपटातील ते गुंड अगदी ताठ मानेने वावरत असलेले पाहून त्यांनाही आपण तसेच करावे असेही वाटत असते, पण ते सारे प्रकार तीन तासाच्या फिल्ममधील असतात हे मात्र त्यांना समजून येत नाही. वास्तवात कोणी असे वागला तर त्याच्या आयुष्याची वाताहत झाल्याशिवाय रहात नाही, पण याची जाणीव उसळत्या रक्ताच्या तरूणांना असतेच असे नाही. जोशात एखादी घटना हातून घडल्यानंतर पुढचे परिणाम भोगतांना मात्र त्या तरूणांसह त्यांचा परिवार हतबल होतो. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली. किरकोळ कारणातून महाविद्यालयीन तरूणांनी धुळा कोळेकर याचा भरदिवसा भररस्त्यावर खून केला. एस.टी.स्टँड परिसरात घडलेल्या या थरारक घटनेचा वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात….