पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली हेडलाइन

मित्राच्या बायकोला बनवले रखेल, भोगून नागवा पडला!तिचा मुलगा गणेशने, सचिन टारझनला कोयत्याने तोडला!

सांगली

सचिन टारझन या अट्टल गुन्हेगाराने समाजात दहशत निर्माण केली होती. लोकांना भीती दाखवून त्याने भरपूर माया जमवली. हरामच्या कमाईचा माज येतो, तसा त्यालाही माज आला होता. त्यातून त्याने गोरगरीबांवर अन्याय केला, महिलांवर अत्याचार केले. ज्या मित्राने आश्रय दिला, त्याच्याच पत्नीला सचिनने रखेल बनवले. तिच्या लहान मुलाला घराबाहेर हाकलून तो तिचा उपभोग घेऊ लागला. त्याच्या दहशतीपुढे त्या महिलेचे व तिच्या लहान मुलाचे काही चालत नव्हते, पण सहनशक्तीचा कधी ना कधी अंत होतोच. केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. सचिननेही केलेल्या पापाचा घडा भरत आला होता. त्या विधवेच्या अवघ्या 19 वर्षाच्या मुलाने सचिनला कोयत्याने वार करून अक्षरश: तोडून टाकला. दहशत संपवली आणि आईवरील अन्यायाचा बदलाही घेतला.

सचिन टारझन खून प्रकरणी कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने फिर्याद दिली. गुन्हा रजि.नं. 137/2023 भा.दं.वि. 302 आर्म अ‍ॅक्ट 4, 25 नुसार संशयित गणेश विनोद मोरे (वय 19) रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली याच्याविरोधात गुन्हा दाखल होवून त्यास अटक करण्यात आली.

यातील सचिन टारझन हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता.

Leave a Comment