पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली

व्यसनी मुलाला मालमत्ता देण्यास नव्हता राजी! प्रदीपने केलेल्या मारहाणीत ठार झाला तानाजी!

सांगली

मुलगा हा म्हातारपणाचा आधार मानला जातो. मुलाला पालक रक्ताचे पाणी करून शिकवून मोठे करतात, त्याच्यात आपले भविष्य पहातात. मुलेही आई-वडीलांचा आदर व सांभाळ करतात, पण काही मुले मात्र नीच प्रवृत्तीची असतात. त्यांना पालकांच्या कष्टाची जाणीव नसते. ते व्यसनाच्या आहारी जातात आणि त्यांच्यासह आई-वडील, बायको-मुलांच्या जगण्यालाही नकोसे करून टाकतात. नशेत भांडण-तंटा रोजचाच होऊन बसतो. जन्मदात्यांवर हात उचलायलाही व्यसनी तरूण मागे-पुढे पहात नाहीत. सांगली जिल्ह्यात व्यसनी मुलाचे जन्मदात्या वडीलांना इतकी मारहाण केली की त्यात त्यांना जीव गमवावा लागला. मुलांच्या हातून वडीलांचा खून झाला. मुलगा तुरूंगात केला. त्याची आई, पत्नी व मुले उघड्यावर पडली. या दुर्दैवी घटनेचा हा वृत्तांत.

Leave a Comment