पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सातारा हेडलाइन

समवयस्क मुलं पण गुन्हेगारीने सडले मन! मित्रांच्या दहशतीने अथर्वने पत्करले मरण!

सातारा

सध्याच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. घरामध्ये मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून चांगल्यात चांगली शाळा, कॉलेज मिळावे याचा अट्टाहास केला जातो. जर पाल्य 10-12 वीला असेल तर पालक अधिक जागरूकतेने काळजी घेतात कारण हे दोन्हीही टप्पे विद्यार्थ्याच्या जीवनाला कलाटणी देणारे असतात. शाळा, क्लास, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, टक्केवारी यातच गुंग असतांना येणारे मानसिक दडपण सहन करत असतांनाच काही आकस्मिक घटनाही घडत असतात. शाळा-कॉलेजमध्ये काही उपद्रवी व्यक्ती व टवाळखोर छेडखानी, गुंडगिरी, दमदाटी करून अडचणी निर्माण करतात. अशाच एका घटनेत दोन गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी खंडणी उकळण्यासाठी दहावीत शिकणार्‍या अथर्व कालीदास सपकाळ (वय 16) यास चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून पैसे नाही दिले तर तुला व तुझ्या आई-वडीलांना मारून टाकू अशी धमकी देत होते. याचेच दडपण येवून घाबरलेल्या अथर्वने दि. 25 जुलै 2023 रोजी आत्महत्या केली. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment