पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

उसने वीस हजार रूपये देऊन चुकले अभिमान! पैसे बुडवण्यासाठी नितीनने घेतले त्यांचे प्राण!

सोलापूर

पैसा हा माणसे जोडण्यापेक्षा माणसा-माणसात वितुष्ट आणण्यासच जास्त कारणीभूत ठरतो. एखादा अडचणीत असेल तेंव्हा मदतीचा हात देणे माणुसकीला धरूनच असते, पण अडचण संपल्यानंतर तो मदत करणार्‍याला विसरला तर मात्र अडचणीचे होते. त्यातच पैशाची उसनवारी असेल तर वाद निश्‍चितच आहे. उसने पैसे परत मागणार्‍याचा राग येतो, त्याचे पैसे बुडवण्याची इच्छा होते, त्यासाठी काही वेळा मदत करणार्‍याचाच घात करण्याचा कृतघ्नपणा केला जातो. याचेच उदाहरण ठरणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली.

एका चहा टपरीवाल्याने अडचणीत एकाकडून वीस हजार रूपये घेतले, पण नंतर पैसे देण्याची टाळाटाळ करू लागला. यातून वाद सुरू झाला आणि पैसे बुडवण्यासाठी त्याने मदत करणार्‍यांचा जीव घेतला. सदर घटनेतील संशयिताचे नाव नितीन दत्तात्रय माळी असे असून त्याने अभिमान मेटकरी याचा कट रचून खून केला आहे. यामध्ये त्याने एका अल्पवयीनाची मदतही घेतली. अवघ्या 12 तासात पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास लावला.

या खून प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, हवालदार शिवाजी पाटील यांनी केला.

Leave a Comment