पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

साक्षीचे चैतन्यवर प्रेम, वडील महेंद्रना नाही रूचले! अडसर दूर करण्यासाठी लेकीचेच कारस्थान रचले!

सोलापूर

प्रेमाला कशाचेही बंधन नसते असे म्हणतात, पण सध्या प्रेम म्हणजे केवळ स्त्री आणि पुरूषातील लैंगिक संबंध इतकेच उरले आहे. बाकी नात्यातील प्रेमाला व मायेला अर्थच उरलेला नाही. त्याच प्रेमसंबंधातून एखाद्याचा जीव घ्यायलाही लोक मागे-पुढे पहात नाहीत. आपल्या प्रेमासाठी पती किंवा पत्नीचा खून करणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनैतिक संबंधातून खून होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच आता प्रेमाला विरोध करणार्‍या आई-बापाचा जीव घेण्याइतका राग मुलांना येत असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. खरे तर लेक ही बापाची खूप लाडकी असते. तिच्यावर बापाचा विश्‍वास असतो, प्रेम असते, पण आता मुलगीच बापाला प्रियकरासाठी ठार मारायला तयार होत असेल तर..? हा सुन्न करणारा प्रश्‍न सोलापूरमधील घटनेने समाजासमोर आ वासून उभा आहे. येथे प्रेमविवाहाला विरोध केला म्हणून मुलीनेच प्रियकराच्या मदतीने बापाचा विश्‍वासघात केल्याचे उघडकीस आले आहेे.

Leave a Comment