पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

शांताबाईला हर्षद म्हणाला,‘पैसे देतीस की नाही सांग?’ नकार देणार्‍या आजीला, ठार मारून नातवाने फेडले पांग!

सोलापूर

आजी-आजोबा आणि नातवंडामध्ये मायेचे एक सुंदर नाते असते. त्यांच्यात एक वेगळीच आस्था असते, त्यामुळेच नातवंडे आजी-आजोबाची लाडकी असतात, तर त्यांची काळजी नातवंडे घेत असतात. पण काही लोक नीच असतात, त्याची प्रवृत्तीच नालायक असते. त्यांना नात्या-गोत्याचा विचारच नसतो. ते केवळ स्वार्थाचा नीच विचार करतात. सोलापूरमध्ये घडलेल्या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. केवळ पैसे दिले नाहीत या कारणातून एका नातवाने आपल्या आजीला जाळून ठार मारण्याची दुर्दैवी घटना घडली. आजीच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देणार्‍या नीच नातवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Comment