पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नंदूरबार महाराष्ट्र हेडलाइन

वडीलांचा केला अपमान, म्हणून पत्नीसह दिले प्राण! त्यामुळे निराश बापाने दिली मृत्यूच्या जबड्यात मान!

नंदूरबार

बाप आणि मुलात मायेचा, आदराचा एक बंध असतो. कोणत्याही मुलाला आपल्या बापाचा अभिमान वाटतो, तर बापालाही मुलाचे कौतुक असते. त्यातच बाप-लेक हळवे असतील तर ते एकमेकाचे मन जपत असतात, पण काही वेळा परिस्थितीच अशी उद्भवते की खटका उडतो. किरकोळ कारणातून मतभेद होतात. विचारपूर्वक निर्णयाने ते मतभेद दूरही होतात. अविचाराने मात्र सगळे आयुष्यच बदलून जाते. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (ता.) या शहरातील तीन टेंभा परिसरातील एकाच घरातील तिघा जणांची आत्महत्या ही घटना सर्वांच्या मनाला चटका देणारी ठरली. बाप-लेकात किरकोळ वाद झाला. ते एकमेकाशी अपमानास्पद बोलले. आपण वडीलांचा अपमान केला या विचाराने बायकोसह त्या तरूणाने आत्महत्या केली. मुलगा आणि सून दोघांनी आत्महत्या केल्याने कोलमडून गेलेल्या बापाने त्याच ठिकाणी आत्महत्या केली.

Leave a Comment