डॉ. संपत काळे प्रयोगशाळेतील आपल्या केबीनमध्ये बसले होते. केबीन संपूर्ण काच तावदानांनी वेढली होती, म्हणूनच त्यांचं अस्तित्व सहजपणे दिसत असे. छोट्या-मोठ्या विविध प्रवेगकांची (अललशश्रशीरीेीं) ती प्रयोगशाळा होती. तेथीलच एका कोपर्यात डॉ. काळेंनी काच तावदानाची केबीन बांधून घेतली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे त्यांना सहज शक्य होई. त्याला लागूनच आतल्या खोलीत मोठा इलेक्ट्रॉन प्रवेगक होता, तर त्याच्या उजवीकडील खोलीत कमी शक्ती असलेला इलेक्ट्रॉन स्त्रोत र्(ीेीीलश) होता…आणि मधल्या खोलीत पदार्थ पृथ्थकरणासाठी लागणार्या विविध यंत्रणा व तंत्रे होती. यात प्रामुख्याने विद्युतीय, प्रकाशीय गुणधर्मांसोबतच जीवाणूंचा अभ्यास करण्यासाठीचीही यंत्रणा उपलब्ध होती.
डॉ. काळे उठले व शेजारीच असलेल्या कॉम्प्युटरवर बसले. त्यांनी काही महत्त्वाच्या इ.मेल्स पाहिल्या आणि बराच वेळ ते त्यात मग्न होते. मध्येच तोंडाचा चंबू करून ते दीर्घ श्वास सोडत असत. एका प्रतिमेवर येऊन ते स्थिरावले.. विचाराअंती डॉ. काळे उठले आणि पुनःश्च खुर्चीत बसत टेबलावरील इंटरकॉम उचलला व नंबर डायल करून रिसीव्हर कानाला लावत म्हणाले.
“हॅलोऽऽ अविनाश आहे का ?”
“ हो सर! मीच बोलतोय.”
“काल मी सांगितलेल्या प्रयोगाचे परिणाम आलेत का?” डॉ. काळेंचा प्रश्न.
“होय! सर आताच मी त्याची जुळवा-जुळव करत होतो.” अविनाश चाचरत म्हणाला होता.
“मग तू आता आणू शकतोस.”
“होय सर! पाच मिनिटांत घेऊन आलोच.”
डॉ. काळेंनी रिसीव्हर ठेवला.. व पुन्हा ते कॉम्प्युटरच्या पडद्यावरील प्रतिकृतीकडे पाहू लागले. ती कुठल्याशा पदार्थांच्या सुक्ष्मदर्शिकेची प्रतिमा होती.
डॉ. काळे खुर्चीत थोडेसे रेलले व आजूबाजूला पहात त्यांनी टेबलावरील एक संदर्भ संशोधन पेपर चाळायला सुरूवात केली.
डॉ. काळे हे पंचेचाळीस वर्षे वयाचे गृहस्थ होते.. त्यांची शारीरिक ठेवण सडपातळ, गौरवर्ण, शिवाय काळेभोर केसं असल्याने ते तिशीतलेच भासत असत. नवीन येणार्याला ते संशोधक विद्यार्थीच जाणवत असत. प्रवेगक, विविध प्रारणे व मुलकणांवरच त्यांचं संशोधन प्रसिद्ध होतं. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन, न्युट्रॉनसारख्या मुलकणांचे उच्च व कमी शक्तींचे प्रवेगक होते. या क्षेत्रात त्यांचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बर्यापैकी काम होतं. हल्ली त्यांचा वैद्यकीय प्रवेगकाकडे (चशवळलरश्र अललशश्रशीरीेीं) ओढा जास्त दिसत होता.
“सर आत येऊ का?”
अविनाशनं काचेचं दार ढकलत केबीनमध्ये प्रवेश केला. वाचण्यात मग्न असलेले डॉ. काळे क्षणात म्हणाले,
“येऽ येऽ अविनाश.. बैस!”
अविनाशनं एक खुर्ची ओढली व तिच्यात स्थानापन्न होत, हातातील प्रयोगांचे परिणाम डॉ. काळेंच्या पुढ्यात ठेवत म्हणाला,
“हेच तुम्ही काल सांगितलेल्या प्रयोगाचे परिणाम आहेत…”
“बघू!” आणि डॉ. काळे एक-एक परिणाम पाहू लागले. मध्येच ते कॉम्प्युटर पडद्यावरील परिणामांची सांगड पुढ्यात असलेल्या परिणामांशी करून, तुलना करू लागले. थोडेसे गंभीर होत म्हणाले,
“अविनाश!”
“एस! सर..”
“साधारण इलेक्ट्रॉनची ऊर्जा व मात्रा (ऊेीश) किती वापरली आहेस?” डॉ. काळेंनी परिणामांकडे पहात विचारलं होतं.
“सर!… पाच, दहा, पंधरा किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी विविध ऊर्जा वापरून, प्रत्येक ऊर्जेच्या इलेक्ट्रॉनसाठी वेगवेगळी मात्रा (वेीश)वापरली आहे. यात प्रामुख्याने एक ते शंभर रॅड (ठअऊ) एवढी मात्रा दिलेली आहे. (रॅड हे प्ररणांचे मोजण्याचे एकक आहे.)” अविनाशनी सखोलपणे सांगितले.
“इट इज् इंटरेस्टिंग…इलेक्ट्रॉन प्रज्वलीत (खीीरवळरींळेप) केलेल्या पॉलीमरवरील सुक्ष्म जीवाणूंची संख्या खूपच वाढली आहे. हे खरं तरं अपेक्षित नव्हतं.” डॉ. काळे विचार करत म्हणाले होते.
“ होय सर!… परिणाम पाहिल्यानंतर मीही तोच विचार करत होतो. खरं तर कमी शक्तीच्या इलेक्ट्रॉन्समुळे पॉलीमरच्या पृष्ठभागावर उणीवा (ऊशषशलीीं) तयार होतात. त्याने जीवाणूंची संख्या कमी होणेच अपेक्षित होते, पण ते खूपच वाढत आहेत.” अविनाशनंही सांगितलं.
डॉ. काळे कॉम्प्युटर पडद्यावरील परिणामाकडे पहात म्हणाले,
“याचा अर्थ अविनाश, इलेक्ट्रॉन प्रज्वलीत न केलेल्या पॉलीमरवरील जीवाणूंची संख्या कमी आहे.”
“होय सर!.. पण हे कशामुळे.. उणीवा तयार झाल्यामुळे जीवाणू तिथे बंदीस्थ होणे अपेक्षित होते.” अविनाशनं शंका व्यक्त केली.
“निश्चितच!…पण त्या आधी उणीवांमध्ये वातावरणातील ऑक्सीजन बंदीस्त झाला.. आणि हाच ऑक्सीजन जीवाणूंसाठी पोषक ठरत आहे.” डॉ. काळेंनी विचार करत सांगितलं.
“काय म्हणताय सर!” अविनाश आश्चर्याने उद्गारला.
“होय. हेच बघ.” वेगवेगळे परिणाम पुढे ठेवत ते म्हणाले, “इलेक्ट्रॉनची मात्रा जशी वाढवीत नेली तशी जीवाणूंची चलता (अलींर्ळींळीूं) व संख्याही मुबलक प्रमाणात वाढतांना दिसत आहे…आणि हीच चिंतेची बाब आहे.” डॉ. काळे गंभीरपणे म्हणाले होते.
“मग आता काय करायचंय सर!” अविनाशचा प्रश्नार्थक भाव.
“प्रथम पॉलीमरवरील जीवाणूंची संख्या कमी करणे आवश्यक आहे, कारण ते अविरत वाढत आहेत हे स्पष्ट आहे. तेच नियंत्रित करण्याची गरज आहे, त्यासाठी एक काम कर..”
“कुठलं सर..”
“याच नमुन्यांवर सोनं आणि चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचा (छरपेरिीींळलश्रशी) थर त्यावर देऊन बघ, कारण हे धातूचे अतिसुक्ष्म कण अशा जीवाणूंसाठी प्रतिजैवक (रपींळलळेींळल) म्हणून कार्य करतात.” डॉ. काळेंनी पुढील दिशा दर्शवली.
“ठिक आहे सर! आपल्या जवळ मूलकणांनी तयार केलेले सोनं व चांदीचे अतिसुक्ष्म कण तयारच आहे. त्यांचा थर देऊन बघतो.” अविनाश निश्चयाने म्हणाला.
“जीवाणू हाताळतांना काळजी घे!.. कारण त्यांची संख्या वाढत असून ते घातकही ठरू शकतात.” डॉ. काळेंनी इशार दिला होता.
“कसा काय सर ! ” अविनाशचा प्रश्न.
“आपल्याला तसं काहीच ठाऊक नाही अविनाश की हे जीवाणू कसे वागतील. त्यांचे गुणधर्म अजून पहायचेत. सो बी केअर फुल.”
“ठिक आहे सर मी काळजी घेतो.. आणि उद्याच तुम्हाला त्यांचे परिणामही सांगतो.” अविनाश टेबलावरचे परिणाम गोळा करत म्हणाला होता.
क्रमशः