पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र हेडलाइन

मुलीने लिहिले प्रेमपत्र, तिला सांगितले समजावून! पण तिच्या नातेवाईकांनी केला नारायणचाच खून!

छत्रपती संभाजी नगर

तारूण्यात प्रेमाच्या आनंदाची भुरळ अनेकांना पडते. मनातला जोडीदार मिळावा यासाठी नजर भिरभिरू लागते. काही वेळा जवळपास रहाणार्‍या, सोबत शिकणार्‍या, नात्यातील कोणावर तरी जीव जडण्याची शक्यता असते. सहवासाने प्रेम वाढते म्हणतात. नेहमीचा सहवास असल्याने जमलेल्या प्रेमात बहुतेकदा अडथळे जास्त येतात, कारण याची कोणी कल्पना केलेली नसते. असे प्रकरण उघडकीस येते, तेंव्हा पालकांकडून विशेषत: मुलीच्या पालकांकडून संताप व्यक्त होतो. हे प्रेमप्रकरण संपवण्यावर जोर दिला जातो. यातून सलोख्याच्या संबंधात वितुष्ट येते. नाती तुटतात. संबंध बिघडतात. काही वेळा संयम सुटतो आणि हाणामारीचे प्रसंग घडतात. त्यातून मग एखाद्याचा जीवही जातो. हे सगळे सामोपचाराने टाळता येऊ शकते, पण समेटाची भाषा बहुतेकदा केली जात नाही आणि पुढचे विपरित टाळता येत नाही. याचाच नमुना छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून आला. मुलीने लिहिलेल्या प्रेमपत्र प्रकरणावरून पेटलेल्या वादात मुलीच्या पालकांनी मुलाचा नाहक बळी घेतला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment