पोलीस टाइम्स
Uncategorized पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

एकदा फसूनही,प्रेमात पडली पुन्हा, मयूरला मारण्याचा रितूकडून गुन्हा!

रितु आणि मयुरचा प्रेमविवाह झालेला, पण हल्ली पटेनासे झालेले. तिला आता सोनू जवळचा वाटू लागला होता. मयूरला सोडून सोनूशी संसार करायला ती उतावीळ झाली. पहिल्या प्रेमविवाहात अपयश आले, तरी दुसर्‍याबरोबर ती सुखाचा संसार करण्याची स्वप्ने पहात होती. त्यासाठी तिने तिच्यावर प्रेम करणार्‍या मयूरलाच यमसदनाला पाठवले. हे पाप लपवण्यासाठी तिने केलेला बनाव फार काळ टिकला नाही. प्रियकराला पती बनवून दुसर्‍या प्रियकरासाठी त्याचा काटा काढणार्‍या रितुला प्रेमिका म्हणावे का?

0000

‘‘रितु… रितु…ए रितु…’’

  अशी कोणीतरी बाहेरून हाक मारत तिच्या घराचा दरवाजा पण ठोठावत होते. दरवाजावरील टकटक ऐकून रितुची झोपमोड झाली. तिने उशीखाली ठेवलेला मोबाईल काढला, तर त्यावर तीन मिस्ड कॉल आलेले होते. मिस्ड कॉल पाहून रितुला पश्‍चाताप झाला व ती स्वतःशीच म्हणाली, ‘‘इतकी गाढ झोप मला लागलीच कशी?’’ तितक्यात बाहेरून तिच्या शेजारी रहाणार्‍या महिलेचा आवाज आला, ‘‘रितु उठलीस की नाही? पावणे सहा वाजले. जॉगींगला येतेस ना?’’ तसे रितुने पटकन ‘‘हो… हो… आलेच…’’ म्हणत डोक्यावरचे केस हातानेच सरळ केले व घरातून बाहेर पडली आणि आपल्या शेजार्‍यांसमवेत जॉगींगला निघून गेली.

दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी रितु मयुर गायकवाड (वय 20) सकाळी आपल्या शेजार्‍यांबरोबर जॉगींगला गेली व परत आली. त्यानंतर काही वेळाने ती शेजार्‍यांची सायकल घेऊन सायकलींगसाठी निघून गेली. त्यानंतर अर्ध्या तासाने ती घरी परत आली व घराचा दरवाजा उघडून आत गेली, तेंव्हा समोरचे भयाण दृष्य पाहून तिने मोठ्यांदा किंकाळी फोडली. तिने जोरात हंबरडा फोडून रडण्यास सुरूवात केली. तसे आजूबाजूचे लोक हातातली सर्व कामे टाकून धावतच तिथे आले. रितु जमिनीवर बसून जोराने हात आपटून विलाप करत होती. समोर अंथरूणात रक्तबंबाळ अवस्थेत रितुचा पती मयुर गायकवाड निपचित पडलेला होता. त्याच्या अवस्थेकडे पाहिल्यावर तो जिवंत नव्हता हे स्पष्ट जाणवत होते. रितुचा आक्रोश ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांचे डोळे नकळत पाणावले.

रितु आणि मयुर यांनी दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघांच्या घरच्यांनी त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांच्या प्रेमविवाहाला स्विकारले होते. रितुची सासू आणि दीर हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे काम करत होते, तर रितुचा पती मयुर हा कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर काम करत होता. म्हणतात ना नव्या नवलाईचे दिवस संपले की वास्तवाची जाणीव होते, कारण जीवन जगण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. तर काही आर्थिक गरजा असतात आणि शारिरीक गरजादेखील असल्याची जाणीव डोळ्यावरील क्षणिक आकर्षणाची पट्टी उतरल्यावर होते आणि अशावेळी आपल्या जोडीदारात असलेल्या उणिवांची जाणीव होते. त्या उणिवांसह आपल्या जोडीदाराला स्विकारण्याची मानसिक तयारी प्रेमविवाह करणार्‍या जोडप्यांमध्ये बर्‍याचदा नसते व यामुळेच प्रेमविवाह  केलेल्या जोडप्यामध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असते. रितु आणि मयुर लग्नानंतर दोन-तीन महिने एकत्र राहिले व त्यानंतर त्यांच्यात वादविवाद होवू लागले. मयुर अधून-मधून दारू, बिअर पित असे व नशेत तो रितुबरोबर कसा वागतोय याचे त्याला भान रहात नसे. रितु या प्रकाराने खूप वैतागून गेली. मयुर नशेत चूर होवून गाढ झोपून जात असे, तर रितु तिची शारिरीक भूक न भागल्यामुळे बेचैन होवून रात्रभर तळमळत जागत असे. मयुरला मात्र याबाबत काहीच कल्पना नव्हती. बर्‍याचदा मयुरकडे काम नसल्यामुळे आर्थिक तंगीचा सामनादेखील रितुला करावा लागत असे.

मयुरबरोबर भांडण झाल्यामुळे रितु घरातून बाहेर पडली व अशीच भरकटत रस्त्यावरून चालत चालली होती, तेंव्हा अचानक एका तरूणाने तिची वाट अडवली आणि तिच्यासमोर हसत उभा राहिला. रितुने दचकून त्याच्याकडे पाहिले. तसे तिच्या चेहर्‍यावरदेखील हास्य उमटले. ‘‘अरे… सोनू तू?’’ असे रितुच्या तोंडून निघाले. तसे सोनूने तिच्याकडे पहात म्हटले, ‘‘अरे काय हा तुझा अवतार? तू तर लव्ह मॅरेज केले आहे ना?’’ तसे रितुच्या डोळ्यातून खळकन आसवे गालावर ओघळली, तेंव्हा सोनूने रितुला रस्त्यातून बाजूला घेतले व विचारले, ‘‘अरे काय झाले? पतीबरोबर भांडण झाले का?’’ तसे रितुने होकारार्थी मान हलवली. तेंव्हा सोनू म्हणाला, ‘‘अरे प्रेम असतं तिथेच भांडणं होतात.’’ त्याला मध्येच अडवत रितु म्हणाली, ‘‘प्रेम बिम काही नाही. मी चुकले. मयुरला ओळखण्यात माझी चूक झाली. मला त्याच्यापासून कसलंच सुख नाही मिळत.’’ रितुने सोनूला मयुरविरूद्धच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. सोनू जयपाल हा रितुचा बालपणीचा मित्र होता. सोनूने रितुला सांगितले, ‘‘रितु तुझ्यावर माझे काल पण प्रेम होते आणि आज पण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, पण तुझ्या लक्षातच कधी आले नाही. तुझ्यासाठी मी काही पण करेन, पण तुला सुखी ठेवेन.’’ रितुला सोनूच्या बाहुपाशात विसावण्यास फार वेळ लागला नाही. सोनू आणि रितुने परत कधी व कुठे भेटायचे हे नक्की केले व एकमेकांचा निरोप घेतला.

त्यानंतर रितु घरी परत आली, पण ती पहिल्यासारखी दुःखी नव्हती, तर कुठेतरी तरी भरभक्कम आधार व तिच्या सर्व गरजा पूर्ण करू शकणारा भेटला याचा तिला आनंद होता. रितुकडे मोबाईल फोन नव्हता, त्यामुळे सोनूशी तिला व सोनूला तिच्याशी संपर्क साधणे कठीण जात होते, म्हणून सोनूने प्रथम एक इनटेल कंपनीचा मोबाईल फोन रितुला घेवून दिला. रितु आणि सोनू एकमेकांशी वेळ मिळेल तेंव्हा मोबाईलवर संपर्क साधू लागले. रितू आता मयूरपेक्षा सोनूबद्दलच जास्त विचार करत होती. कधी एकदा सोनूला भेटतो असे तिला झाले होते. मयूरबरोबर प्रेमाचे दिवस संपले होते, आता सोनूबरोबर प्रेम फुलण्याचे दिवस होते. संधी मिळताच ते दोघे एकांतात भेटले. प्रेमात विफलता आल्याने विरह सोसणार्‍या रितूला सोनूने अलगद मिठीत घेतले. तिला मिठीत घेण्याची स्वप्ने तो अनेक दिवस बघत होता. ती मयूरची झाल्याने निराश झालेल्या सोनूला रितू परत मिळाली होती. त्याने तिला आवेगाने मिठीत आवळले. तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत तो प्रेम व्यक्त करू लागला. या प्रेमाला आता पुढचे पाऊल टाकायचे होते, त्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. त्यांच्या हाताची थरथर तिला जाणवली, ती सुखावली. तिने डोळे मिटून घेतले. त्याच्या प्रेमाचा स्पर्श ती अनुभवू लागली. काही क्षणात आपल्या अंगावरची वस्त्रे बाजूला झाली असून आपण निसर्गावस्थेत असल्याचे तिला जाणवले. दुसर्‍याच क्षणी तिला त्याच्या उबदार शरीराचा स्पर्श झाला. ती हरखून गेली. दारूच्या नशेत मयूर तिच्याशी प्रणय करण्यात कमी पडू लागला होता. पण सोनू तिला हळूहळू फुलवू लागला, तशी तिचे देहभान हरपू लागले. तिच्या नाजूक देहाला होणार्‍या त्याच्या राकट स्पर्शाने ती सुस्कारे सोडू लागली. तसा त्याचा वेग वाढत गेला. पाहता पाहता देहभान हरपून ते एकमेकात मिसळून गेले. शरीरसुखाला उधाण आले, जोरदार समागमानंतर प्रेमवर्षाव करून ते  तृप्त झाले. त्यानंतर ते दोघे बाहेर भेटू लागले व एकांतात आपली शरीराची भूकदेखील भागवू लागले. बर्‍याच वेळा मयुरला कुठे काम नसले की तो घरीच रहायचा तेंव्हा रितुला सोनूला भेटण्यासाठी बाहेर जाण्यास अडचण येत असे. सोनू आणि रितुला मयुरची खूप अडचण वाटू लागली. रितुला सोनूच्या सहवासात आल्यानंतर मयुर आणखीच नकोसा वाटू लागला होता.

एके दिवशी रितु आणि सोनू एकांतात भेटले, तेंव्हा सोनूने रितुचा हात हातात घेतला व म्हणाला, ‘‘रितु माझ्याशी लग्न करशील? तुझ्याशिवाय मला अजिबात करमत नाही. मी तुला राणी बनवून ठेवीन.’’ तशी रितु सोनूला बिलगली व म्हणाली, ‘‘मला पण तुझ्याशिवाय करमत नाही. आणि मी तुझ्याशिवाय जगू पण शकत नाही, पण तुझ्याशी लग्न करण्यासाठी मला मयुरबरोबर आधी घटस्फोट घ्यावा लागेल आणि मला नाही वाटत तो मला सहजासहजी घटस्फोट देईल.’’ तेंव्हा सोनू म्हणाला, ‘‘तो तुला सोडणार नाही हे नक्की आणि तू घटस्फोटासाठी कोर्टात गेलीस तरी त्याला बराच वेळ लागेल आणि मी आणखी जास्त काळ तुला माझ्यापासून दूर ठेवू इच्छित नाही. असे चोरून भेटण्यापेक्षा मला तुझ्याबरोबर राजरोसपणे रहायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला मयुरला रस्त्यातून दूर करावे लागेल.’’ रितुने एक लांब सुस्कारा सोडला व म्हणाली, ‘‘कसे करणार त्याला रस्त्यातून दूर?’’ तसे सोनूने सांगितले, ‘‘त्यासाठी मी एक योजना आखली आहे.’’ रितुने लगेच ‘‘कोणती योजना?’’ असे विचारले, तेंव्हा सोनूने तिला सांगितले, ‘‘ज्यादिवशी तुझी सासू आणि दीर घरी नसतील त्यादिवशी आपण त्याचा खून करू.’’ अनैतिक संबंधाची नशाच काही अशी असते की माणसे आपली सद्सदविवेकबुद्धीच हरवून बसतात. तसेच रितु आणि सोनू ङ्मांच्याबाबतीत झाले होते.

दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी रितुच्या बहीणीचे लग्न होते, म्हणून मयुर रितुबरोबर तिच्या वडीलांच्या घरी गेला होता, पण तिथे जास्त वेळ न थांबता मयुर रितुला म्हणाला, ‘‘आपण घरी जावूया. नाहीतर आपण आणलेले चिकन खराब होईल.’’ रितु आणि मयुर घरी आले. त्यावेळी बराच उशीर झाला होता. मयुर रितुला म्हणाला, ‘‘मला बिअर प्यायची आहे. मला काही कुठे मिळायची नाही. तुझ्या भावाला सांग कुठून तरी आणून दे.’’ घरी रितुची सासू आणि दीर नव्हते, त्यामुळे मयुरला संपवण्याची ही नामी संधी असल्याचे रितुने सोनूला फोन करून सांगितले. तसेच मयुरला बिअर प्यायची आहे. हे सांगून सोनूला घरी बोलावून घेतले व त्याला दोनशे रूपये, बिअर आणून देण्यास सांगितले. सोनूने थोड्या वेळातच बिअर आणून रितुला दिली. रितुने बॉईल चिकन बनवले. त्यासोबत मयुरने बिअर पिली व काही मिनिटातच घोरत झोपून गेला. तसा रितुने सोनूला फोन करून मयुर झोपला असल्याचे सांगितले. त्यावेळी रात्रीचे दीड वाजले होते. रितुने सोनूला ‘‘तू घरी ये. आपण आपल्या रस्त्यातली अडचण कायमची दूर करू.’’ असे सांगितलेे तेंव्हा सोनू म्हणाला, ‘‘मी लगेच आलो असतो, पण आज माझी आई अजून झोपली नाही. तूच त्याला मार.’’  ‘‘ठीक आहे.’’ म्हणून रितुने फोन कट केला व घरातले लाकडी फावडे उचलले आणि मयुरच्या उशाजवळ येवून उभी राहिली. त्याचवेळी झोपेत असणार्‍या मयुरने आपली कूस बदलली. तशी रितु घाबरली व तिने फावडे परत होते त्या जागी नेवून ठेवले. त्यानंतर रात्री परत दोन वाजता रितु उठली. तिने लाकडी फावडे आणले आणि मयुरच्या उशाजवळ उभी राहिली, पण फावड्याचा लाकडी दांडका मयुरच्या डोक्यात मारण्याचे धाडस तिला करवले नाही. मग रितुने परत फावडे होते तिथे नेवून ठेवले आणि झोपून गेली. सकाळी पावणे सहाच्या सुमारास दारावरील टकटक ऐकून रितु उठली व तिने दरवाजा उघडला. दारात शेजारी रहाणार्‍या महिला व मुले होती. त्यातील एका महिलेने रितुला ‘‘जॉगींगला येतेस ना?’’ असे विचारले, तसे रितुने ‘‘हो आलेच.’’ असे म्हणत आपला मोबाईल फोन घेतला. मयुर मात्र गाढ झोेपेत होता. रितुने फोनवर सोनूचे तीन मिस्ड कॉल येवून गेल्याचे पाहिले. रितुने लगेच सोनूला फोन केला, तेंव्हा सोनूने रितुला ‘‘मयुरला मारलेस का?’’ असे विचारले, तेंव्हा रितुने ‘‘मला डेरींगच झाले नाही.’’ असे सांगितले, तेंव्हा सोनू म्हणाला, ‘‘मी बाथरूमला जाण्याचा बहाणा करून तुझ्याकडे येतो.’’ तसे रितुने ‘‘ठीक आहे’’ म्हटले. त्यानंतर रितु जॉगींग करून घरी परत आली व तिने घराचा मागील दरवाजा उघडला. त्यावेळी सकाळचे सात वाजले होते. दारात सोनू उभा होता. दरवाजा उघडल्याबरोबर तो घरात आला व रितुला म्हणाला, ‘‘फावड्याच्या दांडक्याला कापड गुंडाळून दे. त्याच्यावर माझ्या हाताचे ठसे उमटायला नको.’’ तसे रितुने एक टॉवेल फावड्याच्या लाकडी दांडक्याला गुंडाळला व ते फावडे सोनूला दिले. तसे सोनूने पूर्ण ताकदीनिशी फावड्याच्या दांडक्याने मयुरच्या डोक्यात मारले. मयुर गाढ झोपेत असल्यामुळे वेदनेने कण्हत एक बोंब पण मारू शकला नाही. रितु घरी कोणी येतंय का? हे पहाण्यासाठी बाजूला गेली. त्यावेळी सोनूने मयुरच्या डोक्यात अनेक फटके मारले. त्याचा आवाज रितु ऐकत होती. त्यानंतर सोनूने रितुला हाक मारली व आत बोलावले, तो म्हणाला ‘‘एक कपडा दे.’’ तेंव्हा रितुला तिच्या सासूचा एक पिवळ्या रंगाचा ब्लाऊज दिसला. तो तिने सोनूला दिला, तेंव्हा सोनूने निपचित पडलेल्या मयुरचे डोके उचलून गळ्याखालून ब्लाऊज काढला व त्या ब्लाऊजने मयुरच्या गळ्याभोवती आवळले व एक टोक रितुने पकडले व दुसरे टोक सोनूने पकडून दोघांनी मयुरचा गळा आवळला व नंतर ब्लाऊज बाजूला काढून सोनूने मयुरच्या नाकाजवळ बोट नेले व त्याचा श्‍वासोच्छवास चालू आहे का हे पाहिले. त्यानंतर सोनूने मयुरच्या छातीला कान लावून त्याच्या हृदयाची धडधड ऐकू येते का हे पाहिले, पण मयुरच्या हृदयाची हालचाल खूप आधीच बंद झाली होती. सोनू रितुला म्हटला, ‘‘चाकु दे.’’ तसा रितुने चाकू आणला, तेंव्हा सोनू म्हणाला, ‘‘अरे चाकूच्या मुठीला कापड गुंडाळू, नाहीतर माझ्या बोटाचे ठसे उमटतील ना त्याच्यावर.’’ तेंव्हा रितुने फरशीवर आपल्या दीराचा पडलेला एक पांढर्‍या रंगाचा सॉक्स उचलून चाकूच्या मुठीभोवती गुंडाळला. त्या चाकूने सोनूने मयुरच्या गळ्यावर वार केले. त्याने चाकूने ब्लाऊज एका पिशवीत टाकला व त्यानंतर सोनूने रितुला ‘‘घरातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने कुठे ठेवतात?’’ असे विचारले, तेंव्हा रितुने घरातील कपाट सोनूला उघडून दिले. तसे त्यात असलेली थोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेतले व रितुला म्हणाला, ‘‘तू आता थोडा वेळ बाहेर जा आणि घरी परत आल्यावर आरडाओरडा कर. कोणीतरी घरी चोरी करण्यासाठी आले व मयुरने त्याचा विरोध केल्यामुळे त्याचा खून केला असा बनाव कर.’’ तसे रितुने ‘‘हो’’ म्हटले. सोनू मागील दरवाजाने बाहेर गेला व रितुने जवळ रहाणार्‍या ऋतुज याची सायकल सायकलींगसाठी मागून घेतली व बाहेर गेली आणि अर्ध्या तासाने घरी परत आली, तेंव्हा मयुरच्या डोक्यातून, गळ्यातून बरेच रक्त बाहेर आले होते. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून रितुला केल्या कृत्याबद्दल वाईट वाटले, पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. ठरल्याप्रमाणे रितुने आपण घरी नसतांना कोणीतरी चोरीच्या उद्देशाने येवून खून केल्याचा बनाव करून आक्रोश सुरू केला.

या घटनेची खबर देहू रोड पोलीस स्टेशनला देण्यात आली. तसे वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मयुरच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमकरता वायसीएमला पाठवण्यात आला.

रितुला घटनेबद्दल माहिती विचारली असता तिच्या बोलण्यात बरीच विसंगती येत होती. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी रितु हिच्याशी बोलतांना तिच्या बोलतांना येत असलेल्या विसंगतीबद्दल रितुलाच उलट-सुलट प्रश्‍न विचारण्यास सुरूवात केली तेंव्हा रितु गांगरून गेली. रितु काही सराईत गुन्हेगार नव्हती, त्यामुळे थोड्या काळातच तिने पोलिसांसमोर सत्य काय ते सांगून टाकले. तेंव्हा गाफील असलेला रितुचा प्रियकर सोनू हादेखील तासाच्या आतच पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

या प्रकरणी देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नं. 685/2020 भा.दं.वि. कलम 302, 34, 201, 404 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मयुरचा भाऊ ओमकार गायकवाड याने फिर्याद दाखल केली. त्यावरून मयुरची पत्नी रितु मयुर गायकवाड (वय 20) व तिचा प्रियकर सोनू उर्फ ईसुमसाई जयपाल पल्लीकुडथन (वय 22) या दोघांवर गुन्हा दाखल करून दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी अटक करण्यात आले. त्यांना तपासाकरता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात वापरण्यात आलेले फावड्याचे दांडके व इतर वस्तू पोलिसांनी पुराव्याकामी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर करत आहेत. कोणताही पुरावा मागे नसतांना केवळ रितुच्या बोलण्यातील विसंगती व तिचे एकाच दिवशी दोन वेळा जॉगींगला जाणे संशयास्पद वाटल्याने रितुची कसून चौकशी करण्यात आली व खुनाचा गुन्हा उघड झाला.

– प्रतिभा वैद

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!