पोलीस टाइम्स
अकोला गोंदिया चंद्रपूर धुळे नंदूरबार नागपूर नाशिक बुलढाणा भंडारा महाराष्ट्र यवतमाळ वर्धा हेडलाइन

रिता यांच्या हत्येने परिसर हळहळला! आरोपींच्याविरूद्ध संताप खदखदला!

वर्धा

हिंगणघाट येथे तुकडोजी वॉर्ड नावाचा एक विभाग आहे. या ठिकाणी प्रमोद कृष्णाजी ढगे यांचा परिवार रहातो. दि. 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रमोद ढगे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेले. दुपारचे दीड वाजले होते. रिता प्रमोद ढगे (वय 43) घरात एकट्याच होत्या. दुपारची वेळ असल्यामुळे आजूबाजूचे वातावरण शांतच होते. रिता आपल्या घरकामात व्यस्त असतांना अचानक एका इसमाने हातात चाकू घेऊन घरात अनधिकृत प्रवेश केला आणि बेसावध असलेल्या रितावर सपासप वार केले. यावेळी आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील लोक धावले असता आरोपी इसम रिता ढगे यांच्यावर वार करत होता, तसेच लोकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपी इसम मनोरमा ठोबरे व संजय बाभुळकर यांच्या घरासमोरून जोरात पळून गेला.

या घटनेत रिता ढगे यांचा मृत्यू झाला. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत श्‍वान पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यावरून वाल्मिकी चंदनखेडे रा. साईनगर (वय 43) याने दुपारी घरात घुसून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले. घटनास्थळी श्‍वानपथक आल्यानंतर ‘बादल’ नावाच्या श्‍वानाने वाल्मिकी चंदनखेडे याच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मृतक रिता ढगेच्या घरापासून ते आरोपीच्या घरापर्यंत रक्ताचे डागही ‘बादल’ने दाखवले, पण तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.

पोलिसांनी त्याची शोध मोहिम सुरू केली. आरोपी चंद्रपूर येथे नातेवाईकांकडे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथक चंद्रपूरला पोहचले. आरोपी वाल्मिकी यास मौजे कोसरसार जिल्हा चंद्रपूर येथून ए.पी.आय. सुर्यवंशी, पोलीस नाईक उमाकांत लकडे व कॉन्स्टेबल मनोज लोहकरे यांनी ताब्यात घेतले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली. चंदनखेडे याने तपासादरम्यान गुन्हा कबुल केला.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर असे समोर आले की, रिता ढगे हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी सहभागी होता. मयुर उर्फ टिप्पी अशोक सातघरे (वय 20) असे या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडातील खरा सूत्रधार हाच असल्याचे समोर येत आहे.

मृतक महिलेस दोन मुले असून मुलगी पूजा ही पुण्याला खाजगी नोकरी करते तर मुलगा प्रसाद हा सावंगी मेघे येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. रिता या महिलेचे पती प्रमोद हे कोरा या गावात शिक्षक आहेत. त्यांच्या घरी पुढच्या महिन्यात लग्न असल्यामुळे घराची रंगरंगोटी सुरू आहे. मयुर हा रिता ढगे यांच्याकडे घराला रंग देण्याचे काम करत होता.
Denne rolleomvendelse gælder https://denmarkrx.com/brand-levitra-uden-recept.html også for nyligt frigivne APN’er, da de er i deres første position.
दोन-तीन दिवसातच त्याला घराची पूर्ण कल्पना आली होती. प्रमोद ढगे हे शिक्षक असल्यामुळे दररोज किती वाजता घरून निघून जातात व कधी परत येतात याची माहिती मयुरकडे होती. प्रमोद गेल्यानंतर घरात फक्त रिता या एकट्याच असतात अशी माहिती मयुरने वाल्मिकीला पुरवली.

वाल्मिकी चंदनखेडे हा एसार कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. अतिशय कमी पगार असल्यामुळे त्याच्यावर कर्ज वाढले होते. दोन बँकांकडून त्याने कर्ज घेतले होते अशी माहिती समोर आली, परंतु कर्जाची परतफेड व घरखर्च चालवण्यासाठी पैशाची गरज असल्यामुळे आरोपीने घरातील ऐवज लुटण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला व लुटमारीच्या कामात अडथळा आणणार्‍या रिताला त्याने निर्दयीपणे मारले. घटनेच्यावेळी आरोपी क्रमांक दोन मयुर हासुद्धा सोबतच होता. याला पळून जातांना काही लोकांनी बघितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीने दोन दिवसाआधीच नवीन चाकू विकत घेतला होता. घटनेच्या आधीच त्यांनी कट शिजवला होता ही बाब तपासात समोर आल्याने पोलिसांनी 120 ब हे कलम यामध्ये वाढवले. नियोजनबध्दरितीने खून करण्यासाठी मयुरने त्याला मदत केली याबाबत सर्व पुरावे व साक्षीदार पोलिसांना मिळाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!