पोलीस टाइम्स
उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड मराठवाडा महाराष्ट्र सोलापूर हिंगोली हेडलाइन

व्यसनांमुळे संसाराकडे दुर्लक्ष होवू लागलं! सुनिलने निरापराध सीमाला मारून टाकलं!

सोलापूर

सुनिल शंकर पाटोळे (वय 34) रा. आलेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर याला काही वर्षापूर्वी पुणे येथे नोकरी लागली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी वधू शोधण्याचे ठरवले. सुमारे 12 वर्षापूर्वी सुनिल पाटोळे याचे लग्न लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा येथे रहाणार्‍या सीमा कांबळे हिच्याशी झाले. लग्नानंतर सीमा आणि सुनिल यांचा सुखाचा संसार सुरू झाला. कालांतराने या दाम्पत्याला दोन मुली झाल्या.

कालांतराने सुनिल याला दारू-मटक्याचे व्यसन लागले. तो आता सीमाचा छळ करायला सुरूवात केली होती. त्यात तो तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. या सार्‍या प्रकाराला कंटाळून आलेल्या सीमा माहेरी निघून गेली, तेंव्हा तिच्या माहेरी जात तिची त्याने गोड बोलून, तिची माफी मागून आपल्या मूळगावी आलेगावी आणले, पण सुनिलच्या मनात सीमाच्या चारित्र्याबद्दल जी अढी निर्माण झाली होती,ती काही गेली नव्हती. आपण व्यसन करणार नाही, संशय घेणार नाही असे सांगण्याचे त्याने फक्त ढोंग केले होते. खरे तर त्याला तिला कायमचे संपवायचे होते, म्हणूनच सीमाला आणि मुलींना घेवून तो आलेगावी गेला आणि त्याने तिथेच तिचा घात केला. यावरून पोलिसांना सुनिल शंकर पाटोळे तब्बल दहा दिवसांनी अटक केली.

सर्वप्रथम पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत पोलिसांनी सुनिलची चौकशी केली असता त्याने सांगितले की, “गेल्या काही महिन्यात सीमाच्या वागण्यात बदल झाला होता. ती मला अंगालाही हात लावू देत नव्हती. मी मात्र शरीरसुखासाठी आतूर झालो होतो. तिचे दुसर्‍या पुरूषाशी अनैतिक संबंध असल्यामुळेच ती आपणांस टाळते असे सुनिलला वाटू लागले. या गोष्टीचा राग येवून आपण सीमाचा खून केल्याचे त्याने पोलीस कोठडीत कबुल केले.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!