पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा मराठवाडा महाराष्ट्र लातूर

शिक्षक असूनही संशयाने पछाडला वैजनाथ! पत्नी शामलला मारून मुलींना केले अनाथ!

लातूर

पार्श्‍वभूमी

कर्नाटक राज्यातील श्रीमाळी, तालुका भालकी जिल्हा बिदर येथील रहिवासी असलेल्या शामल प्रभाकर ढोले यांचा विवाह लातूर जिल्ह्यातील हालसी तालुका निलंगा येथील वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. पैकी मोठ्या मुलीला शिक्षणासाठी म्हणून आपल्या भावाकडे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे ठेवले असून सध्या वैजनाथ, शामल आणि  लहान मुलगी सृष्टी असे तिघेच अहमदपूर येथे मोहन डांगे यांच्या राजसारथी कॉलनीतील घरी भाड्याने रहातात. वैजनाथ हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

शिक्षकाने केला पत्नीचा खून

दि. 12 मे 2023 पहाटेची वेळ. त्यावेळी दूधवाला भैय्या नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी शिक्षक सुर्यवंशी यांच्या घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे दाराच्या बाहेरूनच आवाज दिला. एक-दोन वेळेस आवाज देवूनही कोणी बाहेर येईनात म्हणून त्याने दाराला हात लावला तर तो आत ढकलला. दार उघडताच समोरचे दृष्य पाहून तो घाबरला. घरामध्ये एक शिक्षकाची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. भैय्याने ओरडतच ही घटना शेजार्‍यांना सांगितली. या सर्व प्रकाराने लगेच गल्लीत चर्चेला सुरूवात झाली. दरम्यान कोणीतरी अहमदपूर पोलीस स्टेशनला या घटनेची खबर दिली.

हा सर्व प्रकार आणि पंचनामा होत असतांनाच त्या तीन रूमपैकी आतील एक रूम कडी बंद असल्याचे लक्षात येताच त्या खोलीची कडी काढण्यात आली, आत वैजनाथ सूर्यवंशी यांची छोटी मुलगी होती. पोलिसांनी तपासाला गती देऊन शामल यांचा चुलत भाऊ गोविंद तातेराव ढोले याच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच शामल यांचा भाऊ मनोज ढोले हा अहमदपूर येथे हजर झाला आणि त्याने रितसर फिर्याद नोंदवली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय

या फिर्यादीमध्ये त्याने स्पष्ट नमूद केले की,  आपल्या बहिणीवर भाऊजी वैजनाथ सुर्यवंशी संशय घेत होते. तू याला बोललीस, त्याला बोललीस. तू त्याच्यासोबत आहेस, म्हणून मारहाण करत होते.  या सततच्या प्रकाराला वैतागून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आपल्याला मारहाण होत असल्याची, पतीकडून छळ होत असल्याची तक्रार करण्यासाठी शामल सुर्यवंशी गेली असता भाऊजी वैजनाथ यांचे सहकारी शिक्षक लोक त्याठिकाणी जाऊन तक्रार करू नका, गुन्हा नोंद झाल्यास भाऊजीची नोकरी जाईल म्हणून तिला समजावून सांगून परत घेऊन गेले होते.  शामल हिच्यावर तू बाहेरच्या लोकांना बोलायचे नाही. तुझे बाहेर संबंध आहेत. म्हणून तिला कत्तीने मानेवर, गळ्यावर, हनुवटीवर, पाठीवर, मनगटावर जबर मारहाण करून व उकळते तेल अंगावर टाकून तिचा खून केला आहे अशी फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून संशयित आरोपी वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (वय 43 वर्ष रा. हालसी ता. निलंगा जि. लातूर सध्या रा. राजसारथी कॉलनी टेंभुर्णी रोड अहमदपूर) याच्याविरूद्ध गुन्हा रजि. नं. 279/23 कलम 302 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी यास अहमदपूर पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचण्यासाठी वर्गणीदार व्हा अथवा नजिकच्या स्टॉलवरून जावून पेपर खरेदी करा!

Leave a Comment